MTD – आधुनिक आलाप गायन कृती Advanced or Modern Melodic Improvisation form for singing Aalaap eb

आधुनिक आलाप गायन कृती

ख्याल गायनाची सुरुवात होण्याबरोबर अनिबद्ध म्हणजे बरोबर ठेका नसणारे आलाप असणारे गायन कमी महत्त्वाचे झाले. अनिबद्ध आलाप म्हणजे बरोबर कोणत्याही तालाचा ठेका नसतो; पण काही (ऎकू न येणा-या, लय गृहीत धरुन त्या) लयींमध्ये केलेले आलाप.
धृपद, धमार गायकी सदैव होती तेव्हा हे आलाप रागस्वरुप दाखविण्यासाठी तालबद्ध गीत म्हणजे चौताल , धमार इ. तालांतील गीत सुरु करण्याअगोदर प्रथम गायनाच रिवाज होता.सर्व प्रथमचा आलाप “अनन्त नारायण हरी” किंवा “तू ही अनन्त हरी” या शब्दांचा उपयोग करुन गायिले जात होते. परंतु कालांतराने या शब्दांचा वापर बईद झला आणि त्यांच्या जागी तोम नोम हे शब्द आले. या मध्ये काही विशिष्ट (शब्दांचा) अक्षरांचा उपयोग (वापर)असतो.
जसे –> तनन रिदन रिद रिदनन तोम नोम इ.
स्वरांच्या र(ह)स्वा, दीर्घ स्वरांच्या रुपाप्रमणे या अक्षरांचा उपयोग करण्याची पध्दत आहे. जेथे सुरांचे विश्रांती आहे, तेथे दीर्घ अक्षरं म्हणजे ना तोम नोम यांचा उपयोग करतात; आणि इतर ठीकाणी रिदनन तनन या (शब्दांचा) अक्षरांचा उपयोग केला जातो.
ख्याल गायक असे रागदर्शक आलाप केवळ रागाचे स्वरुप दाखविण्यासाठी शुद्ध आकारामध्ये बडा ख्याल सुरु करण्याअगोदर थोडा वेळ करतात. पण तोम नोम या अक्षरांनी (शब्दांनी) केलेले आलाप ख्याल गायकीमध्ये गायन करण्याची पद्धत नव्हती. तोम नोम या अक्षरांनी (शब्दांनी) केलेले आलाप ख्याल गायकीमध्ये गायन करण्याची पद्धती सर्वप्रथम “पं. फ़ैय्याज खाँ (बडौदा) साहेब” यांनी सुरु केली आणि त्याचे अनुकरण करत कोणी गायक तोम नोम पासून आलाप गाऊ लागले. पण या दोन्ही प्रकारच्या आलापांमध्ये अंतर आहे ते खालीलप्रमाणे:
(१) आधुनिक आलाप गायनाची कृती – आकारयुक्त आलाप
(२) आधुनिक आलाप गायनाची कृती – तोम नोम या शब्दांच्या मदतीने केलेले आलाप

 

Advanced Melodic Improvisation form for singing Aalaap

 

 

 

संगीत संज्ञा अनुक्रमणिकेकडे अ / Back to Musical Terms’ Dictionary Index A

 

-x-

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s