MTD – तानेचे प्रकार Taan Types eb

तानेचे प्रकार  Different Types of Taans 

तान – ताण म्हणजे तणाव (खेचणे) या पासून ”तान” हा शब्द प्रचलित झाला. आकार , उकार, ईकार इ.चा उपयोग करुन दृत गतिमध्ये केलेल्या रागाच्या स्वरांच्या समुहास तान असे म्हणतात.

 ***

शुद्ध तान , सरल तान – ज्या तानेत लयीचे प्रमाण एक समान असून , आरोहा अवरोहाप्रमाणे स्वरांची रचना असते,  त्या तानेस सरल तान असे म्हणतात. ही तान तीनही सप्तकांत घेता येते. सरळ तानेस कुणी शुद्ध तान असे ही म्हणतात.

***

कुट तान – ज्या तानेत स्वरांचा क्रम  सरळ व साध्या पध्दतीने  न  येता, वक्र असतो, त्या तानेस कुट तान असे म्हणतात.

***

मिश्र तान – काही भाग सरळ काही भाग क्रमहीन असतो, जी तान काही प्रमाणात सरळ साधी आणी काही प्रमाणात वक्र गतिने घेतली जाते, त्या तानेस मिश्र तान असे म्हणतात.

***

बहीलाव तान – जी तान सरळ किंवा वक्र सुद्धा असू शकते, मात्र ज्यामध्ये दमछाट चा उपयोग स्पष्ट स्वरुपात केला असतो,; पुढील किंवा अगोदरच्या स्वरांचा कण स्वर प्रत्येक मुळ स्वराबरोबर घेतला जातो, तिला बहिलाब तान म्हणतात.

***

खटकयाची तान – ही तान लहान स्वरांचे तुकडे जोडुन केली जाते.

***

गिटकली तान –

***

अचरक तान – प्रत्येक स्वर दोन दोन वेळा घेऊन जी तान घेतली जाते, तिला अचरक तान म्हणतात; आग्रा घराण्यात अचरक तान घेण्याची विशेष पध्दती आहे.

***

बोल तान – 

***

सपाट तान – सपाट तान हा एक सरळ तानेचाच प्रकार आहे; ज्या तानेत काही स्वरांवर विशेष भर देऊन , लयीचे प्रमाण एक समान असून साधे आरोह अवरोह असतात , आणि जी तान क्रमाने परंतु अत्यंत जलद बाणाप्रमाणे घेतली जाते , त्या तानेस सपाट तान असे म्हणतात.

***

अलंकारिक तान – ज्या तानेमध्ये अलंकाराचा (पलट्यांचा) विशेष स्वरुपाने प्रयोग केला जातो, त्या तानेला अलंकारिक तान असे म्हणतात.

***

जमजमा तान – सतार ह्या वाद्यावर वाजविला जाणारा तानेचा प्रकार आहे. दोन दोन स्वर पुन्हा पुन्हा एकत्र घेउन त्यांचा क्रम बदलत जी तान घेतली जाते त्या तानेस जमजमा तान असे म्हणतात. झमझमा तान , झमझमची तान असेही कुणी म्हणतात. स्वरांची पुनरुक्ती ब-याच प्रमाणात असते.

***

लडंत तान  – काही स्वर वाक्ये एकमेकांशी विरोधाभास करत असतात; आणि ती स्वर्वाक्ये जेव्हा ताने मध्ये वापरली जातात, तेव्हा त्या तानेस लडंत तान असे म्हणतात.

***

 

संगीत संज्ञा अनुक्रमणिकेकडे त / Back to Musical Index Page

 

 

गमक तान – ज्या तानेची स्वरांच्या कंपनाने निर्मिती होते आणि एक स्वर पुन्हा पुन्हा निर्माण ही होतो, त्या तानेस गमक तान असे म्हणतात.

आडी तान –

अक्षिप्तिका तान – शब्द स्वर व ताल यांच्या सहाय्याने घेतली / गायिली जाणारी तान म्हणजे अक्षिप्तिका तान होय.

ऊठाव तान – राग ओळखण्यासाठी वापरली जाणारी विशेष स्वर समुहांची तान पद्धती म्हणजे ऊठाव तान होय.

चलन तान – ज्या तानेत रागाचे आरोह अवरोह साधे किंवा वक्र गतिने घेतले / गायिले जातात त्या तानेस चलन तान असे म्हणतात.

जबड्याची तान
हा मुळत: तानेचा कोणताही प्रकार नाही. पण ज्या गायकांचे आवाज नैसर्गिक रित्या तानेसाठी हलत नाहीत, ते गायक जलद जबडा हलवून तान घेतात.

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s