POI1 – तंबोरा Tamboraa Taanpuraa Tanpura

तंबोरा  Taanpuraa

तंबोरा  – स्वयंभु नाद , सहाय्यक नाद , स्वरसंगती , प्रेरक किंवा प्रेरित सहाय्यक नाद

स्वर आंदोलन संख्या नादोत्पत्ती स्वर आंदोलन संख्या नादोत्पत्ती
प. १८० X  १ = १८० प. मंद्र म. १६०  X  १ = १६० म. मंद्र
प. १८० X    २ = ३६० प मध्य म. १६०  X  २ = ३२० म मध्य
प. १८०  X  ३ = ५४० रें तार म. १६०  X  ३  = ४८० सां तार
प. १८० X  ४ = ७२० पं तार म. १६० X  ४ = ६४० मं तार
प. १८० X  ५ = ९०० नीं तार म. १६० X  ५ = ८०० धं तार
प. १८० X  ६ = १०८० रें अतितार म. १६० X  ६ = ९६० सां अतितार
प. १८०  X  ७ = १२६० मं अतितार म. १६० X  ७ = ११२० गं अतितार
अतितार मं–>  १२८० पेक्षा कमी तार धं –> ८१० अतितार गं –> ११५२
सा. १२०  १ = १२० मंद्र सा सा २४० X    १ = २४० मध्य सा
सा. १२०  २  = २४० मध्य सा सा २४०  X  २ = ४८० तार सां
सा. १२०   ३ = ३६० मध्य प सा २४०  X  ३ = ७२० पं तार
सा. १२०   ४ = ४८० तार सां सा २४०  X  ४ = ९६० अतितार सां
सा. १२०   ५ = ६०० तार गं पेक्षा कमी सा २४० X  ५  = १२०० गं अतितार आसपास
सा. १२०   ६ = ७२० तार पं सा २४० X  ६  = १४४० पं अतितार आसपास
सा. १२०   ७ = ८४० तार नी॒ सा २४० X  ७ = १६८० अतितार नी॒ आसपास
अतितार गं ११५२ अतितार नी॒ १४२०

 

तंबोरा या वाद्ययंत्रामध्ये तारयंत्राचा प्रयोग आहे. हे अत्याधुनिक प्राचीन वाद्ययंत्र आहे. गायन व वादनाच्या बैठकीला स्वर देण्यासाठी तंबो-याचा उपयोग करतात. त्यामुळे स्वर स्थिर रहातो.

तंबोरा हा कडू भोपळा  , साग , या लाकडाच्या सहाय्याने बनवितात.

तंबो-याचे तुंबा , तबली, दांडी, तारदान (पांचरपट्टी) , मेरु , जव्हारी , घोडी, खुंट्या , मणी इ. भाग असतात.

Taanpuraa (Tamboraa) has following various parts within the whole instrument being  ‘Taanpuraa’  –  Tumbaa , Tablee , Dandi , Taardaan ( Paancharpatti) , Meru , Javhaari , Ghodi , Khuntyaa, Mani

तबली Tabali Tabli Tabalee Tablee –>

आवाज घुमण्यासाठी भोपळा विशिष्ट आकारात कापून त्यावर लाकडी आच्छादन केले जाते, त्यानंतर त्या भोपळ्यावर लाकडी आच्छादन केलेल्या भागास ”तबली” असे म्हणतात.

तुंबा Tumbaa –>

भोपळ्यावर केल्या जाणा-या लाकडी आच्छादनास “तुंबा” असे म्हणतात.

म्हणजे तबली वर तुंबा चं आच्छादन.  तुंबा आणि तबली यांस लांब व आतून पोकळ असलेली लांब दांडी जोडलेली असते; या दांडयाच्या डोक्यावर चार खुंट्या असतात. दोन दोन एका दिशेला अशी रचना सहसा असते.

मेरु Meru –>

तंबो-यामध्ये तुंबा आणि तबली यांस लांब व आतून पोकळ असलेली लांब दांडी जोडलेली असते त्या दांडीवर वरच्या बाजूस तारा टेकविण्यासाठी खुंट्यांच्या खाली हस्तीदंती पांचरपट्टी असते, तिला “मेरु” असे म्हणतात.

तारदान Taardaan –>

मेरु च्या वर थोड्या अंतरावर चार भोके असलेली दुसरी पांचरपट्टी असते, ज्यातून तारा ओवलेल्या असतात ; त्यास “तारदान” असे म्हणतात.
तारदान च्या प्रत्येक भोकातून एक अशा रितीने तारा ओवून त्या चार खुंट्यांना पिरगळून बांधल्या जातात.

घोडी Ghodi Ghodee –>
तबलीवर पाटाच्या आकाराची लहान घडवंची असते, तिला “घोडी” असे म्हणतात. ही घोडी हत्तीचे दात , लाकूड किंवा हरिणाच्या शिंगांपासून तयार केलेली असते. तसेच तारदान देखील हत्तेचे दात किंबा हरिणाच्या शिंगांपासून बनविलेले असते.

तारदान आणि मेरु यातून येणा-या तारा घोडीवर येतील अशी योजना असते व तेथून त्या , तानपु-याच्या भोपळ्याच्या दर्शनी भागात बसविलेल्या खास लाकडी पट्टीमध्ये भोके पाडून घट्ट बसविल्या जातात.

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s