POB6 – स्व. ना. मो. खरे – १८८९ – १९३८ Naa. Mo. Khare – 1889 – 1938

स्व. ना. मो. खरे

ना. मो. खरे यांचा जन्म १८८९ मध्ये झाला. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत पूर्व मॅट्रीकचा विद्यालयीन अभ्यास त्यांनी पूर्ण केला.
पं. विष्णू दिगंबर पलुस्कर या गुरुंकडे लाहोर मध्ये गांधर्व महाविद्यालयात ना. मो. खरे यांचे संगीताचे शिक्षण झाले.
ग्वाल्हेर घराण्याची गायकी लाभलेल्या कंठ संगीताबरोबर शास्त्र विषयाच्या आकर्षणाने ना. मो. खरे यांनी शास्त्राचा सखोल अभ्यास केला.
त्यांच्या संशोधनामुळे त्यांचे शास्त्रविषयक विवेचन “गुजरात मां संगीतनु पुनरुत्थान” या ग्रंथात प्रसिद्ध झालेले आहे.
त्याकाळी महात्माजींच्या साबरमती आश्रमामध्ये रोजच्या प्रार्थना चांगल्या रितीने म्हणुन दाखविण्यासाठी महात्माजींना एका चांगल्या संगीतज्ञाची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी पं. वि. दि. पलुस्करांकडे शिष्याची मागणी केली असताखरे यांना त्यांच्याकडे पाठविण्यात आले. ख-यांची मनोवृत्ती , एकनिष्ठ असलेली कार्य करण्याची प्रवृत्ती यामुळे महात्माजींनी त्यांना राजकीय व सामजिक कार्यात एकरुप करुन घेतले.
निवडक कार्यकर्त्यांमध्येही त्यांचा समावेश झाला. गुजरात मध्ये तेव्हा संगीत शिक्षणाची सोय नव्हती. तेथे म्हणुनच गांधर्व महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. खरे यांनी गुजरात विद्यापीठात संगीत विषयाचा अंतर्भाव करवून तेथे संगीत अध्यापनाचे कार्य ही केले. खरे हे मुलभूत संगीत शिक्षाकाची दृष्टी लाभलेले होते. अनेक होतकरु मुलेहुडकुन त्यांना विनामुल्य संगीत विद्या त्यांनी शिकविली. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या निधनानंतर गांधर्व महाविद्यालय मंडळाची स्थापना सर्व शिष्यांनी मिळून केली. त्या मंडळाचे पहिले कार्यवाह म्हणून पं. खरे यांनी काम केले. त्यांच्या पुढील काळात गांधर्व महाविद्यालयाची जडणघडण घडविण्यात ते झटले. १९३८ साली अहमदाबाद येथे ना. मो. खरे यांचे निधन झाले.

***

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s